

नाशिक (सिन्नर) : सिन्नर येथील उद्योग भवन परिसरात आईवडील घरात नसल्याचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि.10) घडली. या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व संशयित आरोपी हे अकोले तालुक्यातील रहिवासी असून, सध्या ते उद्योग भवन आजूबाजूला राहतात. फिर्यादी व त्यांचे पती कामावर गेलेले असताना पीडित बालिका घरात एकटीच होती. हीच संधी साधून संशयिताने घरात शिरून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केला. नातेवाईक कामावरून घरी आल्यानंतर पीडित बालिकेने घडला प्रकार कथन केला. त्यानंतर सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.