नाशिक : मक्का मदीना, हनुमानाची प्रतिमा हातात घेत एकोप्याचे दर्शन | पुढारी

नाशिक : मक्का मदीना, हनुमानाची प्रतिमा हातात घेत एकोप्याचे दर्शन

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी
सध्याला सर्वत्र जाती धर्मात तेढ निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथे सर्व समाज बांधवांकडून एकोप्याचे दर्शन घडवण्यात येऊन विविध प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंदू बांधवानी मक्का मदीनाची तर मुस्लिम बांधवानी हनुमानाची प्रतिमा हातात घेऊन आम्ही सर्व एक आहोत असा संदेश दिला.

हिंदू, मुस्लिम, ख्रिच्शन, आदिवासी बांधव आदि सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एकोपा रहावा यासाठी येथील जून्या वनविभाग निवासस्थानांच्या समोर प्रत्येक धर्मातील प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १० मे ते १० जून असा एक महिना सुरू राहणार असून यादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन, निसर्ग पुजा व व्याख्यान असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

याप्रसंगी मौलाना अबू शेख, अकिल पठाण, राजूबाबा शेख, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, वसंत बागुल, दानियल गांगुर्डे, मायकल भोये, जॉन, योगेश थोरात, राहुल गावित, कान्हा हिरे, परसराम गावित, रहिम वाणी, नबू गोरी, शाकिर खान आदींसह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button