नाशिक : रिंग गिअर वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी डॉ. कराड | पुढारी

नाशिक : रिंग गिअर वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी डॉ. कराड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : सीटू संलग्न असलेली रिंग गिअर वर्कर्स युनियनची निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 7) सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. सर्व मतदारांनी निवडणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निवडणूक पार पाडली. सात जागांसाठी एकूण 17 उमेदवार रिंगणात उभे होते. रिंग गिअर वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी डॉ. डी. एल. कराड, तर उपाध्यक्षपदी कॉ. सीताराम ठोंबरे यांची अगोदरच निवड झालेली आहे. सरचिटणीसपदी हरिभाऊ तांबे, उपाध्यक्ष नामदेव खताळे, खजिनदार, संदीप दळवी, चिटणीस तानाजी गायकर, चिटणीस मदन आंबेकर, सदस्यपदी बाबासाहेब पांगारकर, विलास माळी यांची लोकशाही पद्धतीने जनतेतून निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. आर. मॅनेजर नानासाहेब कोळगे, एचआरचे समाधान मते, सीटूचे संतोष कुलकर्णी यांनी काम पाहिले. पोपटराव पायगुडे यांनी सहाय्य केले. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल कामगारांचे कंपनीच्या वतीने आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button