नाशिक : पवारांचे विचार पोहोचविण्यासाठी शरद युवा संवाद यात्रा उपक्रम | पुढारी

नाशिक : पवारांचे विचार पोहोचविण्यासाठी शरद युवा संवाद यात्रा उपक्रम

इगतपुरी/घोटी : पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीच्या तोंडावर जातीयवाद निर्माण करणे हेच भारतीय जनता पक्षाचे काम आहे. भाजप ही संविधान मानणारी नसून मनुस्मृती मानणारी पार्टी आहे. भाजप म्हणजे भारत जलाव पार्टी असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात शरद पवारांचे विचार पोहोचविण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

शरद युवा संवाद यात्रेनिमित्त घोटीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार शिवराम झोले अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, प्रदेश सचिव शाहबाज शेख, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जि. प. सदस्य उदय जाधव, माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर आदी उपस्थित होते. भाजपचे ओबीसी प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून, त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असल्याचे शेख यांनी सांगितले.

पक्षप्रवेश आणि पदाधिकार्‍यांची नियुक्ती : शरद युवा संवाद यात्रेच्या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वासाळीचे सरपंच काशीनाथ कोरडे, कुरूंगवाडीचे सरपंच गोपाळ सावंत, कावनईचे गोपाळ पाटील, कुर्णोलीचे ग्रामस्थ यांनी असंख्य कार्यकर्ते समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तर अनेक पदाधिकारी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button