नाशिक : ग्रामीण भागात गट प्रारूप आराखडे चर्चेत | पुढारी

नाशिक : ग्रामीण भागात गट प्रारूप आराखडे चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या प्रारूप आराखड्यांबाबत निवडणूक आयोगांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुगल मॅप व 2011 च्या जनगणनेशी जोडल्यानंतर आता ग्रामीण भागात तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गटांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणत्या तालुक्यातील किती गट वाढले, कोणत्या गटात कोणते गाव समाविष्ट केले, याबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार्‍या गटांच्या प्रारूप आराखड्यांची प्रतीक्षा सर्वांना आहे.

राज्य सरकारने मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेतल्यानंतर ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण बहाल झाल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे गावोगावचे राजकीय वातावरण शांत झाले होते. सर्व कार्यकर्ते विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्यग्र होेते. त्यातच मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने दि. 6 ते 8 मे या काळात सर्व 25 ज्ल्ह्यिांमधील गटांचे आराखडे गुगल मॅपला तसेच 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्या निश्चित केली. आता गटांचे प्रारूप आराखडे जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे गावोगावी पुन्हा फेब्रुवारीमध्ये तहसीलदारांनी प्रारूप आराखडे तयार करून निवडणूक आयोगाला पाठविलेल्या गट रचनांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
त्यावेळी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या संभाव्य गटरचनांनुसार पुन्हा गावोगावी आडाखे बांधण्याचे काम सुरू आहे. सरकारने यापूर्वीच राजपत्राद्वारे नाशिक जिल्ह्यातील गट संख्या 84 असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या वाढलेल्या गटांबाबतही आडाखे बांधणे पुन्हा सुरू झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button