धुळे : प्रहारचा दणका; शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनी परत

पिंपळनेर : जमिनी परत मिळाल्याने आनंदाने शेतात नांगरणी करताना शेतकरी. (छाया:अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : जमिनी परत मिळाल्याने आनंदाने शेतात नांगरणी करताना शेतकरी. (छाया:अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा : महाजनकोने शिवाजीनगर येथील काही शेतक-यांच्या जमिनीवर विनामोबदला ताबा मिळवला होता. याबाबत शेतक-यांच्या मदतीने प्रहार जनशक्ती पक्षाने उपोषण छेडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना हक्काच्या जमिनी परत मिळाल्या आहेत.

प्रहार जनशक्तीच्या दणक्याने साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथील गट. क्र.128 मधील शेतजमिनीवर महाजनको लिमिटेड कंपनीतफेॅ गोदरेज कंपनी उभारत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातफेॅ तहसील कार्यालयसमोर निवदेनाव्दारे करण्यात आली. तसेच याबाबत दि. 25 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. आदिवासी व इतर शेतकरी बांधवांच्या हक्काच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हुकूमशाही पध्दतीने कंपनीने ताबा मिळवला होता. परंतु, प्रहार जनशक्तीने उपोषणाचे शस्त्र हाती घेत जवळपास ४० शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आता या जमिनीवर शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्या असून शेतक-यांनी आनंदाने पावसाळापूर्वी ट्रॅक्टरने नांगरणी सुरू केली आहे. तसेच प्रहारचे उपप्रमुख नानाजी शेलार, शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राहुल गवळे, राजू कोरडकर, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश जाधव, संपर्कप्रमुख सोमसिंग राजपूत यांचे जमिनी परत मिळाल्याने शेतक-यांनी आभार मानलेे.

जिथे अन्याय तिथे प्रहार… साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमाफिया सुरू असल्याने प्रहार जनशक्ती आवाज उठवणार आहे. महाजनको सौर ऊर्जा कंपनी जवळपास शंभर एकर क्षेत्र शेतकरी बांधवांना कुठलाही मोबदला न देता हडप करण्याचा डाव आखत होती. शेतक-यांच्या न्यायासाठी तालुक्यात नेहमीच प्रहार भक्कमपणे उभा आहे. असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास भदाणे यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news