मातृत्वाची भावना साजरे करणारे हे आहेत ' मराठी ' चित्रपट | पुढारी

मातृत्वाची भावना साजरे करणारे हे आहेत ' मराठी ' चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई आणि मुल हे नातंच अनोखं असतं. या नात्यातील प्रेम, जिव्हाळा हा अमूल्य असतो. आपण याची तुलना कोणत्याच नात्याशी करू शकत नाही. हे नातं जपत, त्याला फुलवणं हे प्रत्येक मूलाचं कर्तव्य आहे. पण आजकाल धक्काधक्कीच्या काळात आपण आपल्या आईला आपला वेळ देऊ शकत नाही. आईचं हे नातं वेगळ्या पद्घतीने समजून घेण्यासाठी ‘ आई ‘ वरील चित्रपट बघून तुमचा आजचा मदर्स डे साजरा करा+

हे आहेत ‘ मातृत्वाची भावना साजरे करणारे ‘  चित्रपट

‘हिरकणी’

हिरकणी हा सोनाली कुलकर्णी अभिनीत भारतीय मराठी ऐतिहासिक चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून, फाल्गुनी पटेल निर्मित आहे. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात सोनाली कुलकर्णी ही ‘हिरकणी’ची भूमिका साकारली आहे. हिरकणी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील रायगड किल्ल्याजवळ राहणारी एक शूर स्त्री आणि एक अद्भुत आई होती. जिने आपल्या मुलासाठी ओढीने रायगड गडावरील हिरकणी बुरूज सर केला होता.

‘बकेट लिस्ट’

बकेट लिस्ट हा तेजस प्रभा आणि विजय देवस्करा दिग्दर्शित मराठी भाषेतील विनोदी-नाटक चित्रपट आहे. चित्रपटाची सुरुवात समर्पित गृहिणी मधुरा (माधुरी दीक्षित) तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी (पती मोहन (सुमीत राघवन), मुलगी, मुलगा, सासरे आणि आजी) साठी अनुकूल जेवण बनवण्यापासून होते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिने तिचे संपूर्ण अस्तित्व कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी समर्पित केल्याचे यामध्ये दाखवण्यात आहे आहे.

‘राजमाता जिजाऊ’

यशवंत भालकर दिग्दर्शित या चित्रपटात डॉ. स्मिता देशमुख, अमोल कोल्हे, मिलिंद गुणाजी, राहुल सोलापूरकर, आरती शिंदे, वेदांत गुंडू, निखिल नेर्लेकर, शिवम जाधव आणि चंद्रशेखर सौदागर यांच्या भूमिका आहेत. राजमाता जिजाऊंच्या जीवन प्रवासाभोवती ही कथा फिरते.यामध्ये जिजाऊंची शिकवण आणि मूल्यांचे शिवाजी राजांच्या जडणघडणीतील महत्त्व दाखवले आहे.

‘नाळ’

नाळ’ हा सुधाकर रेड्डी यक्कंती लिखित-दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे निर्मित मराठी चित्रपट आहे. यामधील कथा ही मुख्यतः भावनिक आहे. या चित्रपटातील चैतन्य हा महाराष्ट्रातील एका दुर्गम खेड्यात राहणारा आठ वर्षांचा खोडकर मुलगा आहे. चैत्या (श्रीनिवास पोकळे) एका छोट्या गावात आई (देविका दफ्तरदार) वडील (नागराज मंजुळे) आणि आजी सोबत राहत असतो. तो आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. पण आई-वडील हे त्याचे खरे पालक नसून त्यांनी त्याला दत्तक घेतले आहे, हे कळल्यावर त्या चिमुकल्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शकने खूप छान प्रकारे यामध्ये मांडले आहे.

‘झाले मोकळे आकाश’

Zale Mokale Aakash - Disney+ Hotstar

‘झाले मोकळे आकाश’ हे मराठी नाटक आहे. नेहा (पल्लवी वैद्य) आणि समीर (सुबोध भावे) यांना कळते की त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाच्या काही विशेष गरजा आहेत. ज्या पूर्ण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास समीर(सुबोध भावे) असमर्थ आहेय दत्तक घेतलेल्या मुलाबाबत तो नेहमीच अविचारी निर्णय घेतो. मध्येच मुलाची जन्मदाती आई आगमनाने नेहा आणि समीर यांच्या नात्यात गुंतागुंत निर्माण होते.

‘मी सिंधुताई सपकाळ’

Mee Sindhutai Sapkal'

अनंत नारायण महादेवन यांची ‘मी सिंधुताई सपकाळ’ ही गाथा हृदयाला स्पर्श करणारी आणि प्रत्येक माणसाला सर्व प्रतिकूलतेशी लढण्यासाठी प्रेरित करणारी आहे. आजच्या काळात आणि युगात, जिथे महिला सबलीकरणाच्या विषयाभोवती फिरणाऱ्या चित्रपटांना महत्त्व प्राप्त होत आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या वास्तविक जीवनावर आधारित हा चित्रपट आणि त्यांच्या कलाकृती थक्क करणाऱ्या आहेत. तेजस्विनी पंडितने ही व्यक्तिरेखा इतकी छान साकारली आहे की, प्रेक्षकही हा चित्रपट पाहताना थक्क होतात.

Back to top button