नाशिक : पदरमोड करुन, सामाजिक बांधिलकी जपत भागविली तहान | पुढारी

नाशिक : पदरमोड करुन, सामाजिक बांधिलकी जपत भागविली तहान

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहराला पाणीपुरवठा करणारी 16 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असणारी पाइपलाइन जीर्ण झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाणीटंचाईमुळे 15 ते 20 दिवसांआड होणार्‍या पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांसाठी सामाजिक बांधिलकी जपत जि. प. सदस्य डी. के. नाना जगताप व कृषी बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी पदरमोड करून ग्रामस्थांसाठी 2 मोफत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत.

नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लासलगावकरांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यातही महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जगताप यांनी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना प्रत्येक नगरात सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत टँकरमार्फत मोफत पाणीपुरवठा सुरूच राहील, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

Back to top button