धुळे : त्या नर बिबट्यावर अंत्यसंस्कार, कसे करतात अंत्यसंस्कार?

धुळे : त्या नर बिबट्यावर अंत्यसंस्कार, कसे करतात अंत्यसंस्कार?

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील प्रतापपूर शिवारात प्रगतिशील शेतकरी अंकुश काशिनाथ गांगुर्डे यांच्या शेतातील नाल्यालगत नर बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली. दरम्यान आज वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बिबट्याचे वय साधारणतः 10 ते 11 वर्ष होते.

शेतकरी गांगुर्डे शेती शिवारात गेले असता त्यांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ पिंपळनेर वनविभागाच्या कार्यालयास माहिती दिली. पिंपळनेर वनपरिक्षेत्राधिकारी अरूण माळके, दिघावे वनपरिमंडळाचे वनपाल डी. डी. चौधरी, वनरक्षक अमोल पवार, तानाजी चव्हाण, पवन ढोले, वनकर्मचारी श्री. शिंदे, श्री. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीत मृत बिबटयाचे सर्व अवयव शाबूत आढळून आले. शरीरावर कुठलीही जखम आढळली नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमाडे व डॉ. बेले यांनी शवविच्छेदन केले.

पशुवैद्यकीय अधिका-यांच्या प्राथमिक चौकशीनुसार बिबट्याचा मृत्यू वार्धक्याने झाला आहे. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला. मृत बिबट्यावर वनअधिकारी, कर्मचारी, पशु वैद्यकिय अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाल्याने वन्यप्राणीही हैराण झाले आहेत. दिघावे परिसर नैसर्गिक दृष्ट्या वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अधिक आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news