पुणे : मारुती मंदिरात मनसेकडून महाआरतीचे आयाेजन

पुणे : मारूती मंदिर
पुणे : मारूती मंदिर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये मारुती मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मनसे कार्यकर्त्यांनी थोडासा बाजूला ठेवल्याचे दिसून येते.

पुण्यात कोथरूड, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ यांसह काही ठिकाणी मारुती मंदिरात महाआरती होणार असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे . राज्यात आजपासून मशिदीवर लावलेले ध्वनिवर्धक काढून टाकावे, या मागणीसाठी मनसेने आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशावेळी पुण्यात मात्र वादाचे प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येते आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news