जळगाव येथे साडेचार किलो गांजा हस्तगत, तरुणाला अटक | पुढारी

जळगाव येथे साडेचार किलो गांजा हस्तगत, तरुणाला अटक

जळगाव; पुढारी ऑनलाईन : जळगाव शहरातील आर. एल. चौफुलीवर बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव ते औरंगाबाद रोडवरील आर. एल. चौफुलीवर बेकायदेशीररित्या (दि.०३) रात्री ८ च्या सुमारास एकजण विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार संशयित आरोपीवर कारवाई करण्यात आली.

हातात पाकीट घेवून गांजाची विक्री करतांना संशयित आरोपी बबलू उर्फ टारझन अरूण दहेकर हा जळगाव येथे आढळून आला.

पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

त्याची कसून चौकशी केल्यास १३ हजार ४५५ रूपये किंमतीचा ४ किलो ४८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई…

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांनी कारवाई केली.

हे ही पाहा :

Back to top button