नाशिक : ‘आरटीई’साठी उद्या अखेरची संधी

आरटीई www.pudhari.news
आरटीई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्यात प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, आतापर्यंत 52 हजार 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्यापही 38 हजार 585 जागा रिक्त आहेत. शुक्रवारी (दि.29) लॉटरीतील प्रवेशाची अखेरची मुदत आहे.

आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 422 शाळांमधील 4 हजार 927 जागांसाठी फेब—ुवारीपासून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. मार्चमध्ये 4 हजार 513 विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड करण्यात आली होती. बुधवारी (दि.27) सायंकाळपर्यंत नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 725 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर 1 हजार 788 जागा अद्यापही रिक्त आहेत. रिक्त जागा प्रतीक्षा यादीतून भरल्या जाणार असून, या यादीच्या वेळापत्रकाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या लॉटरीतील विद्यार्थी प्रवेशाचे कार्यालयीन कामकाज सध्या सुरू आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. साधारणत: प्रतीक्षा यादीच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पालकांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'आरटीई' प्रवेशाची स्थिती
शाळा 9,086
उपलब्ध जागा 1,01,906
प्राप्त अर्ज 2,82,783
लॉटरी निवड 90,685
प्रवेश निश्चित 52,100
रिक्त जागा 38,585

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news