नाशिकची तृप्ती जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रशिक्षकपदी | पुढारी

नाशिकची तृप्ती जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रशिक्षकपदी

नाशिक (मनमाड) पुढारी वृत्तसेवा : हेराक्लिओन येथे होणाऱ्या जागतिक स्तरावरील ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय जुनियर मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी येथील जय भवानी व्यायाम शाळेची खेळाडू व आयएनएस कोच तृप्ती शेखर पाराशर यांची निवड झाली. नाशिक जिल्ह्यातील मनमाड सारख्या ग्रामीण भागातील एका खेळाडूची भारताच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असून या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तृप्तीचे अभिनंदन होत आहे.

२९ एप्रिल ते १२ मे दरम्यान ग्रीस या देशातील शहरात जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर मुलींच्या संघ प्रशिक्षकपदी तृप्तीची निवड झाल्याने जिल्ह्यातील ती आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून निवड झालेली पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे. राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक असलेली तृप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून सज्ज झाली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा :

Back to top button