धुळे : महागाई विरोधात काँगेसचे भोंगे बजाव आंदोलन  | पुढारी

धुळे : महागाई विरोधात काँगेसचे भोंगे बजाव आंदोलन 

धुळे : पुढारी वृत्तसेवा : जनतेचे खरे प्रश्‍नांपासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी देशात जातीयतेचे आणि भोंग्याचे राजकारण सुरु आहे. भोंग्याचे राजकारण करायचे असेल तर जनतेच्या प्रश्‍नांसाठी करा. इंधनदरवाढीमुळे जनता होरपळली जात आहे. त्यामुळे भाव तत्काळ कमी करा, अन्यथा या देशातील जनता केंद्रसरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या भोंगा आंदोलनात दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या सूचनेवरुन काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.२५) धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वाढत्या महागाई विरोधात भोंगा वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान यांच्या आवाजात महागाईच्या ध्वनीफीत वाजविण्यात आल्या. प्रारंभी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर शेठ,काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील,जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील,पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते .

अशी आहे ध्वनीफीत : आंदोलनस्थळी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी लोटगाडीवर भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची ध्वनीफीत वाजवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रश्‍नोत्तर स्वरुपातील भाषणातील अंश भोंग्यावर वाजविण्यात आला. त्यामुळे जनतेचे लक्ष वेधत आंदोलन लक्षवेधी ठरले. तब्बल तीन तास भोंगे लावून आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button