यवतमाळ : घाटंजी बाजार समितीमधील ७० व्यापारी अडते, हमाल मापारीचे परवाने रद्द

यवतमाळ : घाटंजी बाजार समितीमधील ७० व्यापारी अडते, हमाल मापारीचे परवाने रद्द
Published on
Updated on

घाटंजी; पुढारी वृत्तसेवा : घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी अडते व हमाल मापारीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश सहाय्यक निबंधक सचिनकुमार कुडमेथे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे व सचिव कपील चन्नावार यांना दिले आहेत. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ माजली आहे.

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत लक्ष्मण पोतराजे यांनी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यवतमाळ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था घाटंजी यांच्याकडे २६ ऑगस्ट २०२१ रोजी लेखी तक्रार दिली होती. यात घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनुज्ञप्ती उपसमितीच्या सभेत बेकायदेशीररीत्या व्यापारी अडते व हमाल मापारीचे नांवे वाढवून मतदार यादीत जवळच्या लोकांचा समावेश करण्यात आल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरुन २७ सप्टेंबर २०२१ रोजी घाटंजी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना चौकशी करुन नियमानुसार कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यावरुन सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सचिनकुमार कुडमेथे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजार समिती महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी व विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे. त्यानुसार बाजार समितीचे कामकाज उक्त कायदा व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार चालविणे बाजार समितीवर बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात सहाय्यक निबंधक सचिनकुमार कुडमेथे यांनी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनुज्ञप्ती उपसमितीचे ईतिवृत, व्यापारी अडते, हमाल मापारी यांचे परवाने व आवश्यक सर्व रेकार्डची प्रत्यक्षरित्या तपासणी केली.

यात परिशिष्ट 'अ' मधील नमुद व्यापारी परवाना आणि अडते परवाना धारक यांचे त्रयस्थ व्यक्ती पतदारी असणे, अनुज्ञप्ती तरतुदीनुसार बाजार यार्डवर कामकाज न करणे, बँक खाते उतारा सादर न करणे या वरुन त्यांचा परवाना केवळ बाजार समिती निवडणूक करिता मतदार म्हणून पात्र होण्यासाठी केवळ कागदोपत्री परवाना नूतनीकरण करण्यात आले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसेच परिशिष्ट 'ब' मधील नमुद हमाल परवाना धारक कोणतेही कामकाज करित नसल्याचे निदर्शनास येत असून केवळ बाजार समिती निवडणुक करिता मतदार म्हणून पात्र होण्यासाठी केवळ कागदोपत्री परवाना नूतनीकरण करण्यात आल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी व विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 40 (ई) नुसार व्यापारी व अडते नामें उस्मानखाँ, शुभांशु शुक्ला, अजगर तंवर, नसिम तंवर, सना तंवर, सलमा तंवर, शोएब तंवर, शमीमबानो तंवर, उस्मान चव्हाण, सतिष अजाबराव भोयर, सुधाकर राठोड, सतिष घोडे, गजानन राठोड, किशोर गिरी, राम खांडरे, अविनाश आवारी, आकाश बेलोरकर, निलेश डंभारे, नरसिंग राठोड, संतोष कानकाटे, अजाब आत्राम, विजय जाधव, दिलीप राठोड, निखील बिलोणे, रोहित वैश्य, राजेश आडे, भाउराव राठोड, किसन आडे, नर्मदा नामदेवराव आडे, बेबीबाई आडे, गजानन राठोड, यादव आडे, शंकर शिदुरकर, शैलेश कनोजे, अमृता गिनगुले, सुजीत डंभारे, रमेश वाघाडे (धान्य), आयुष जैस्वाल, विजय लांडगे, अमलकुमार गोहणे, चंद्रकांत बेजपवार, अशोक निबुदे, बाबुलाल राठोड, किशोर बोबडे, मुसा दुंगे, देविदास खांडरे, सानीया फानन, सैय्यद मुदस्सीर, निलोफर दुंगे, ईरफान अंसारी, सैय्यद रफीक, सैय्यद सादीक, सैय्यद रहीम मामदाणी, फहीम अन्सारी, सैय्यद अबरार, सुरज उल्हे, विश्वास भुत, विनोद देठे आदीं ५९ व्यापारी व अडते यांचा समावेश आहे. तर ११ हमाल मापारी मध्ये कैलास ढगले, दिलीप टेकाम, गणेश गिनगुले, मंगेश वाडगुरे, सुभाष पेटकुले, संतोष कांडुरवार, अक्षय वाडगुरे, सुधाकर धोंगडे, संतोष ठाकरे, संभा मंत्रीवार व राजु बावणे आदींचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news