पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला आयपीएल ( Women's IPL ) स्पर्धा केव्हापासून सुरु होणार? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर लवकर मिळेल असे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात मागील काही दिवस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यांची चर्चा सुरु आहे. नुकतीच यासंदर्भात बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाली. यावेळी महिला आयपीएल स्पर्धांचे आयोजनावर सखोल चर्चा झाली. आता पुढील वर्षापासून ही स्पर्धा सुरु होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आपला प्रतिभा दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी 'एएनआय'शी बाेलताना स्पष्ट केले.
महिला आरपीएल सुरु करणे हा मागील काही वर्षातील चर्चेचा विषय आहे. यासाठी आम्ही मागील काही वर्ष नियोजन करत आहोत. आता प्रत्यक्षात स्पर्धा आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत. काही फ्रँचायझींनी यामध्ये स्वारस्य दाखवले आहे. आयपीएलमध्ये एकुण सहा संघ असतील अशी शक्यता आहे. यासाठीची लिलाव प्रक्रिया आणि स्पर्धेच्या अनुषंगाने येणार्या अन्य बाबींवर आम्ही विचार करत असल्याचे माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिली आहे.
महिला आयपीएलसाठी योग्य नियोजन, खेळाडूचे लिलाव, स्पर्धेचे नियम आदी विषयांवर काम सुरु आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही
स्पर्धा घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याासंदर्भात सर्व नियोजन पार पडल्यानंतर आम्ही स्पर्धेची अधिकृत घोषणा करु, असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
पाहा व्हिडीओ :