नाशिक : वादातून पत्नीची विषारी औषध सेवन करुन तर पतीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

नाशिक : वादातून पत्नीची विषारी औषध सेवन करुन तर पतीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा ; पती-पत्नीत वाद होऊन पत्नीने विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर पतीनेही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील खेलदरी गावात शनिवारी (दि. 16) रात्री घडली.

खेलदरी येथील किरण चिंधू दौंड (35) व पत्नी रेखा किरण दौंड (30) यांच्यात शनिवारी (दि. 16) रात्री भांडण झाले होते. त्यातूनच पत्नीने विषारी औषध सेवन केले. तिला उपचारांसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर दुसरीकडे पती किरणनेही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.

वडनेर भैरवचे सहायक पोलिस निरीक्षक शकील शेख, पोलिस नाईक विजय घुमरे, अनिल गांगोडे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पती किरणने आत्महत्या केली, त्या विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्याचा अंधारात शोध घेणे अवघड झाले होते.त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील रेस्क्यू टीम बोलावण्यात आली होती. अखेर विहिरीतील पाणी उपसल्यावर पहाटे किरणचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व ग्रामस्थांना यश आले. मृत किरण व रेखा यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व आई, वडील असा परिवार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news