जीतनराम मांझी, "देशातील धार्मिक मिरवणुकांवर बंदी घाला, देशाची एकता धोक्यात" | पुढारी

जीतनराम मांझी, "देशातील धार्मिक मिरवणुकांवर बंदी घाला, देशाची एकता धोक्यात"

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाची राजधानी दिल्लीच्या जहांगिरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंसा घडली. त्यावरून दिल्ली पोलिसांनी १० माणसांची टीम तयार केली आहे. यावरून केंद्रीय पातळीवरील राजकारण चांगलेच गरम झालेले आहे. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संरक्षक जीतनराम मांझी यांनी धार्मिक मिरवणुकांवर बंदी घालण्याची मागणी केली.

मांझी यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, “देशात निघणाऱ्या धार्मिक मिरवणुकांवर बंदी घालण्याची आता वेळ आली आहे. या धार्मिक मिरवणुकांमुळेच देशाची अखंडता आणि एकता धोक्यात आलेली दिसून येत आहे. यावर त्वरीत बंदी घालावी लागेल”, असं ट्विट करत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केलेले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवा वाद छेडला आहे.

यापूर्वीही जीतनराम मांझी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत. त्यांनी नुकतेच श्री राम या विषयावरून एक विधान केलेले होते. त्यांनी स्वतःला शबरीचा वंशज सांगितले होते. पण, रामाला त्यांनी काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले होते की, “जे लोक रामाला मानतात ते दलितांचे उष्टे का खात नाहीत. मोठ्या लोकांना सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली आहे.”

मांझी म्हणाले होते की, “आम्ही तुलसीदासाला मानतो, वाल्मिकीलादेखील मानतो. मात्र, रामाला मानत नाही. पण तुम्ही म्हणता आम्ही रामाला मानतो. रामाने तर आमची माता असणाऱ्या शबरीची उष्टी बोरं खाल्ली. तर आज आमचे उष्टे खाऊन दाखवा ना… आज तुम्ही आमची उष्टे केलेले खात नाही. याच रामाच्या गोष्टी तुम्ही करता. आपल्या स्वार्थासाठी मोठ्या लोकांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी सामान्य लोकांच्यात फूट पाडली आहे.”

पहा व्हिडिओ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानात आजही त्यांच्या आठवणी आहेत

Back to top button