आता अकोला पोलीसांनी मागितली गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेची परवानगी | पुढारी

आता अकोला पोलीसांनी मागितली गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेची परवानगी

अकोला; पुढारी वृत्तसेवा : एसटी कर्मचा-यांचे तथाकथित नेते ॲड. गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्याची मागणी अकोट शहर पोलिसांनी न्यायालयात मागितली आहे. सदावर्ते यांचा मोबाईल डेटा काढण्यात येणार असून त्याद्वारे त्यांच्या संपर्कात असलेल्या एसटी कर्मचा-यांनाही अकोट पोलिस तपासासाठी ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष तथा महामंडळाचे माजी संचालक विजय मालोकार यांच्या तक्रारीने सदावर्तेंच्या अडचणीत जास्त वाढ झाली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचा-यांच्या भावनांशी खेळत पैसे वसूल केले. हे पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी त्यांची पत्नीसह औरंगाबाद येथील अजय गुजर या कर्मचा-याला हाताशी धरले. एसटी कर्मचा-यांकडून 300 ते 500 रुपये गोळा केले. गोळा केलेले हे पैसे अकोट येथील कर्मचा-यांमार्फत औरंगाबाद येथील अजय गुजरच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे विजय मालोकार यांनी तक्रारीत म्हटले. त्यानंतर पुढील तपासासाठी अकोट शहर पोलिसांनी गुजर व अकोट येथील प्रफुल्ल गावंडे यास अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. या दोघांना हाताशी धरून सदावर्ते यांनी इतर ठिकाणीही कर्मचा-यांकडून पैसे वसूल केले असावे असा अंदाज तपास अधिका-यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी तपासाची चर्केही फिरवली आहेत.

‘त्या’ कर्मचा-यांनाही सहआरोपी करा : मालोकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांना अकोट आगारातून स्वखुशीने पैसे पुरविल्याचा दावा करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणीही एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button