रणबीर-आलिया : एक कोटी लाईक्स! | पुढारी

रणबीर-आलिया : एक कोटी लाईक्स!

पुढारी ऑनलाईन : 
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 14 एप्रिलला मुंबईत विवाह झाला. पाली हिलवरील ‘वास्तू’ बिल्डिंगमध्ये झालेल्या या लग्‍नाबाबत दोघांच्या देश-विदेशातील चाहत्यांना कुतुहल होते. दोघांच्या लग्‍नाची चर्चा अनेक महिन्यांपासून होती आणि या जोडप्याला वधू-वराच्या रूपात पाहायला त्यांचे चाहते अतिशय उत्सुक होते. त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या लग्‍नाचे फोटो समोर आले त्यावेळी काही मिनिटांमध्येच त्यांना लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले.

अवघ्या बारा तासांत या लाईक्सची संख्या 95 लाखांवर पोहोचली होती. आता हा आकडा 1 कोटी, 15 लाख, 36 हजार, 349 पेक्षाही अधिक झाला आहे. डिसेंबरमध्ये लग्‍नबंधनात अडकलेल्या विकी कौशल आणि कॅटरिना कैफचे फोटो हे आजपर्यंतचे सर्वाधिक लाईक केलेले लग्‍नाचे फोटो होते, त्यांचा हा विक्रम आता रणबीर-आलियाने मोडला आहे!

Back to top button