कर्नाटक : सेंट्रिंग कामगाराचा गळा चिरून खून ; मृतदेह ठेवला बागेतील बाकावर | पुढारी

कर्नाटक : सेंट्रिंग कामगाराचा गळा चिरून खून ; मृतदेह ठेवला बागेतील बाकावर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

सेंट्रिंग कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना नाझर कॅम्प वडगाव येथे उघडकीस आली आहे. शंकर ऊर्फ बाळू मारुती पाटील (वय 40, रा. यरमाळ रोड, वडगाव) असे त्याचे नाव आहे. शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात झालेला हा 26 वा खून आहे.

फुले गल्‍ली, फुले चिल्ड्रन्स पार्क, नाझर कॅम्प येथे एका व्यक्‍तीला गळा चिरून पार्कजवळील सिमेंटच्या बाकावर झोपवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. मृताचे मामा सचिन बसवंत रणदिवे (रा. यरमानळ रोड, वडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधावारी रात्री 10.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 वा. या वेळेत बाळू याचा अज्ञाताकडून निर्जनस्थळी घेऊन जाऊन गळाचिरुन खून करण्यात आला आहे.

या नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला पुन्हा नाझरकॅम्प येथील सिमेंट बाकावर झोपविण्यात आले आहे.
खून नेमका कोणत्या कारणासाठी झाल्याचे मात्र स्पष्ट झालेले नाही. पोलिस निरीक्षक मंजुनाथ बडीगेर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचलत का ?

Back to top button