

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा ; मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉइंटजवळ चालकाचा ताबा सुटल्याने आयशरने पुढच्या कारसह ट्रकला जोरदार धडक दिली. त्यानंतर आयशर उलटला. या अपघातात एक जण गंभीर, तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.
हा अपघात झाल्यावर काही वेळातच त्याच ठिकाणी स्पीडब्रेकरवर एका कंटेनरने चार वाहनांना धडक दिल्याने या अपघातात सहा महिला जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातांची माहिती मिळताच, महामार्ग पोलिस अधिकारी अमोल वालझाडे व पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना नरेंद्र महाराज रुग्ण संस्थानच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे घाटात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.