नाशिक : झुणका-भाकर योजना बंद होऊनही सुरु होते केंद्र ; अखेर पडला महापालिकेचा हातोडा | पुढारी

नाशिक : झुणका-भाकर योजना बंद होऊनही सुरु होते केंद्र ; अखेर पडला महापालिकेचा हातोडा

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा ; सातपूर आयटीआय सिग्नलजवळ अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या झुणका-भाकर केंद्रावर महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई करीत अतिक्रमित हॉटेल जमीनदोस्त केले आहे.

युती सरकारच्या काळात राज्यात ठिकठिकाणी झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून सातपूर आयटीआय सिग्नल येथे हे केंद्र सुरू होते. झुणका-भाकर योजना बंद होऊनही बराच कालावधी उलटला असताना, केंद्रचालकाने स्वतःचे हॉटेल, थाटात निवासस्थानदेखील थाटले होते. नाशिक महापालिका नूतन आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने, तसेच याबाबत नूतन मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा :

Back to top button