#RanbirAliaWedding : रणबीर-आलियाच्‍या लग्‍नाळू चाहत्‍यांकडून मीम्सचा पाऊस | पुढारी

#RanbirAliaWedding : रणबीर-आलियाच्‍या लग्‍नाळू चाहत्‍यांकडून मीम्सचा पाऊस

पुढारी ऑनलाईन : चार वर्षाच्या डेटींगनंतर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत.  लग्‍नाची तयारी दोन्ही कुटुबियांकडून जोरदार तयारी झाली असून नुकतेच मेंहदी आणि संगीत सोहळा पार पडला आहे. दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्‍नाळू चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. यामुळे वेगवेगळे  मीम्स बनवत त्‍यांची  खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर #RanbirAliaWedding ट्रेंड व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर #RanbirAliaWedding सुरू झाला आहे. यातून काही नेटकऱ्यांनी आलिया आणि रणबीरला लग्नाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्‍यांच्‍यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत लग्नासंदर्भात वेगवेगळे मीन्स बनवले जात आहेत. काही मीन्समध्ये मालिकेतील आणि चित्रपटातील सीन्स दाखवून आलिया आणि रणबीरचा उल्लेख केला आहे.

यातील एका मीन्समध्ये रणबीर जिन्याच्या खालच्या बाजूला बसलेला तर आलिया त्याच्या वरील बाजूस उभारलेली दिसत आहे. शेअर झालेल्या एका फनी व्हिडिओत रणबीर आपलं मत मांडत असून रडताना तर आलिया त्याच्या कानाखाली मारताना दिसतेय. याच दरम्यान असंख्य मीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी आलिया रणबीरची क्रश असल्याची वृत्त समोर आलं होते.

निवडक निमंत्रकांच्‍या उपस्‍थितीत रणबीर आणि आलियाच्या लग्‍न बंधनात अडकरणार आहेत. लग्‍नाचे  फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button