नाशिक : माजी खासदार देवीदास पिंगळे यांची निर्दोष मुक्तता | पुढारी

नाशिक : माजी खासदार देवीदास पिंगळे यांची निर्दोष मुक्तता

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सुरू असलेल्या खटल्यात नाशिक जिल्हा सञ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. गेल्या सहा वर्षांपासून हा खटला सुरू होता. नाशिकसह अवघ्या सहकार व राजकीय क्षेत्राचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून होते. अखेर सत्याचा विजय झालाच, अशी प्रतिक्रिया पिंगळे यांनी निकालानंतर व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button