

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : नुकतीच आई एकविरा देवीची चैत्री यात्रा पार पडली. यात्रेनंतर गड परिसर अस्वच्छ झाला होता. त्यामुळे कार्ला गडावर युवा सेनेच्या वतीने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
यावेळी युवा सेना तालुका अधिकारी शाम सुतार, विशाल हुलावळे, शिव वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पंकज खोले, वेहेरगाव शिवसेना शाखाप्रमुख कैलास पडवळ, योगेश खांडभोर,
नितिन देशमुख, शुभम गायकवाड, राजेश फुणसे, मयूर थोपटे, उपविभाग अधिकारी प्रकाश थरकुडे, अमर बराटे,सागर शिंदे, रूपेश आंबेकर, संदिप देशमुख, मारूती देवकर आदी उपस्थित होते.