नाशिक : धावपटूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान | पुढारी

नाशिक : धावपटूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नाशिक : केरळ येथे पार पडलेल्या २५ वी सिनियर नॅशनल ॲथलेटीक चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी चमकदार कामगिरी केली. धावपटू संजीवनी जाधवने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण तर ५ किलोमीटर स्पर्धेत कांस्य पदक, कोमल जगदाळेने ३ किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. तसेच यमुना लडकत हिने ८०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावत २७ वर्षापूर्वी असलेल्या महाराष्ट्रातील धावपटूचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

तर किसन तडवी याने ५ किलीमिटर स्पर्धेत सहभाग घेऊन १४ मिनिट १७ सेकंदाची वेळ नोंदवीत बेस्ट परफॉर्मन्स केला. या विजेत्या खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक विजेंद्र सिंह तसेच महेंद्रा कंपनीचे अनिल वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button