नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा ; नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या निषेधार्थ येथील मारवाडी समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. 7) सायंकाळी मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बियाणी यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. येथील मारवाडी समाजातर्फे बालाजी मंदिर, शिवाजी रोड, मेनरोडमार्गे ओझर पोलिस चौकीपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे, मंडल अधिकारी गिरीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष प्रवीण लढ्ढा, सचिव मुकुंद जाजू, ओमकोचे संचालक रवींद्र भट्टड, रामेश्वर लढ्ढा, प्रकाश चोपडा, सुनील बाफणा, संजय सारडा, संतोष लढ्ढा, नंदलाल नावंदर, संजय लढ्ढा, विनोद चांडक, मोहन ब्यास, बाळकृष्ण जाजू आदींसह महिलांनी मूक मोर्चात सहभाग घेतला.