नाशिक : जिल्हा रुग्णालयात वावरणार्‍या ‘त्या’ तिघींना जामीन | पुढारी

नाशिक : जिल्हा रुग्णालयात वावरणार्‍या ‘त्या’ तिघींना जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात वावरणार्‍या तिघींना न्यायालयाने जामीन दिला आहे. यापैकी एक महिला गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन वावरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे तोतया डॉक्टर असल्याच्या संशयावरून तिघींविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांच्या फिर्यादीनुसार संशयित महिला या मंगळवारी (दि. 5) सकाळच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागात विनाकारण फिरताना आढळून आल्या. त्यापैकी मेघा गणेश शेट्टी या महिलेकडे स्टेथोस्कोप आढळून आला.

तिच्याकडे ओळखपत्र किंवा डॉक्टर असल्याचे पुरावे मागितले असता तिने ते देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे इतर दोघींनीही रुग्णालयात वावरण्याचे कारण स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे तिघींनाही सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (दि.6) तिघींनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन दिला.

सुरक्षितता वार्‍यावर,,,,
या घटनेमुळे पुन्हा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिलांचा रुग्णालयात वावरण्याचा हेतू स्पष्ट झाला नव्हता. त्यातच बाह्यरुग्ण विभागात अनेक दिवसांपासून त्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक किती सतर्क असतात याचा प्रत्यय आला आहे. लहान मुलांची सुरक्षितता, रुग्ण-नातलगांकडील मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता वार्‍यावर असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button