जळगाव : क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक | पुढारी

जळगाव : क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्यातून ९९ हजार ८६२ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजीव श्रीराम पाटील (५४, रा. बेलसवाडी, मुक्ताईनगर) हे शेतकरी असून, दि. ३ ते ५ जानेवारी दरम्यान त्यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडिट कार्ड आले होते. कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतानाही पोस्टाने क्रेडिट कार्ड घरपोच आल्याचा पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला.

याच काळात त्यांना त्यांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करून, बँकेतून बोलत असल्याचे भासविले. तसेच पोस्टाने घरी आलेले क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने पाटील यांची ९९ हजार ८६२ रुपयांत ऑनलाइन फसवणूक केली. तसेच विश्वास संपादन करुन संजीव पाटील यांच्याकडून ओटीपी क्रमांकही मिळवून परस्पर ऑनलाइन खरेदी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

 

Back to top button