नाशिक : …म्हणून बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, गुन्हा दाखल | पुढारी

नाशिक : ...म्हणून बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, गुन्हा दाखल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील विजयनगर येथे साईबाबा मंदिरासमोर पोलिसांची कोणतीही लेखी परवानगी न घेता वाढदिवसाचे आयोजन करीत डीजे लावून 100 ते 150 लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि. 3) सायंकाळच्या सुमारास सिडकोतील विजयनगर, साईबाबा मंदिरासमोर वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी 100 ते 150 नागरिकांची गर्दी जमविण्यात आली होती. यासह डीजे वाजविण्याची सक्त मनाई असतानाही या आदेशाचे उल्लंघन केले होते. तसेच पोलिस आयुक्तालयातून कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याने आयोजक अमोल खंदारे (30, रा. मोरवाडी, सिडको), संजय हिरामण त्रिभुवन (40, रा. आंबेडकर चौक, देवळाली कॅम्प) या दोघांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक संदीप निर्मळ यांच्या फिर्यादीनुसार पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button