त्याने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे 90 डोस | पुढारी

त्याने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे 90 डोस

एडिनबर्ग : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जगात कोरोना महामारीचा प्रकोप सुरूच आहे. कोरोना संपला असे वाटत असतानाच त्याचे नवे व्हेरिएंट समोर येते. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी जगभरात कोरोना व्हॅक्सिनचे डोस घेण्याचा सल्ला देण्यात येत आहेत. काही देशांमध्ये तर बूस्टर डोसही दिला जात आहे. असे असताना जर्मनीतील एका व्यक्‍तीने कोरोना व्हॅक्सिनचे एक दोन नव्हे तर तब्बल 90 डोस घेतल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी तो 91 व्या वेळी डोस घेण्यासाठी आला तेव्हा त्याला पकडण्यात आले.

कोरोना व्हॅक्सिनचे 90 डोस घेणारी व्यक्‍ती 60 वर्षांची असल्याचे समजते. मात्र, त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. अथवा त्याच्यावर कसला परिणाम झाला का? याचीही माहिती देण्यात आलेली नाही. जर्मनीतील सॅक्सनी येथे राहणारा हा माणूस एडिनबर्ग येथील व्हॅक्सिनेशन सेंटरवर पकडला गेला. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार जर्मनीतील एका वयस्क व्यक्‍तीने 90 वेळा कोरोनावरची लस घेतली.

जेणेकरून बनावट प्रमाणपत्र तयार करून ती इतरांना विकता येतील. ही प्रमाणपत्रे तो अशा लोकांना विकायचा की, ज्यांना लस घ्यावयाची नाही. मात्र, अखेर त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीस सुरुवात केली आहे. जर्मनीतील अनेक लोकांना कोरोना लस घ्यावयाची नसते. यामुळे ते अशी बनावट प्रमाणपत्रे खरेदी करतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button