अंबरनाथ : तक्रार नोंदवायला गेलेला फिर्यादीच निघाला बोगस डॉक्टर | पुढारी

अंबरनाथ : तक्रार नोंदवायला गेलेला फिर्यादीच निघाला बोगस डॉक्टर

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील टीसीच्या कार्यालयात ५ जणांची तक्रार करायला गेलेला फिर्यादी बोगस डॉक्टर असल्याचे उघडकीस आले. रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.२) अंबरनाथ स्थानकावरील रेल्वेच्या लगेज डब्यात बसलेल्या बोगस डॉक्टराने त्याच्याच शेजारी बसलेल्या काही जणांची चौकशी केली. यावेळी त्या तरुण मुलांकडे तिकीट नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर या बोगस डॉक्टराने थेट अंबरनाथ स्थानकातील टीसीचे कार्यालय गाठून त्या मुलांची तक्रार केली. यावेळी तुम्हाला तिकीट तपासणी करण्याचा काय अधिकार आहे, असे टीसी कार्यालयातून त्याला विचारण्यात आले. त्यानंतर त्या डॉक्टराने मी रेल्वे मध्ये मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगितले.

मात्र, तो यावेळी गांगरल्याचे निदर्शनास आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे डॉक्टर असल्याचे बोगस सर्टिफिकिट आढळून आले. त्याच्याकडे मेडिकलची काही उपकरणे सापडली. ही उपकरणे जप्त केली असून तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button