जळगाव : जामनेरमध्ये डॉक्टरसह रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ला | पुढारी

जळगाव : जामनेरमध्ये डॉक्टरसह रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; आनंद मार्केट येथील भक्ती रुग्णालयात बाह्यरुग्ण कक्षात थांबण्यावरून वाद होऊन रुग्णांच्या नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच मारहाण केली.

जामनेर शहरातील जळगाव रोडवरील आनंद मार्केटमध्ये डॉ. सचिन पाटील यांच्या भक्ती नेत्रालय रुग्णालयात गुरुवारी (दि. ३१) सकाळी बजरंगपुरा येथील काही रुग्ण त्यांच्या नातेवाइकांसोबत आले होते. गर्दीमुळे रुग्णांनाच बसायला जागा नसल्याने कर्मचाऱ्यांनी रुग्णांसोबत आलेल्यांना बाह्यरुग्ण कक्षाबाहेर थांबण्यास सांगितले.

मात्र. तप्त उन्हामुळे रुग्णालयात बसायला जागा मिळण्याबाबत रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन रुग्णांच्या नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांवर हल्ला केला. या घटनेचा निषेध करीत जामनेर असोसिएशनतर्फे जामनेर पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button