पिंपरी : दावा मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण | पुढारी

पिंपरी : दावा मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सासरच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ घडली. अशपाक लियाकत शेख, हसीना लियाकत शेख, लियाकत इसाक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

‘भाजप महाराष्ट्रात अतिरेक्यांप्रमाणे कारवाई करत आहे; जशासं तसं उत्तर द्यावं लागेल’

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास गुरुद्वारा चौक येथून घरी येत होत्या.

त्यावेळी आरोपी पती अशपाक आणि अन्य दोघांनी येऊन फिर्यादी यांना ‘तू सर्व केस मागे घे. नाहीतर मी तुला बघून घेईल’, अशी धमकी दिली.

टोयोटाची हायलक्स अ‍ॅडव्हेंचर कार लवकरच बाजारात

त्यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात, हातावर, कमरेवर मारहाण केली. तसेच, पोटात लाथाबुक्कया मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button