पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा | पुढारी

पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये आजअखेर 3.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पुढील साडेचार महिने पुरेल असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे.

मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.51 टीएमसी आहे. पवना धरणाची पाणीपातळी 4995.80 दसलक्ष घनफूट आहे.

ठाकरे सरकारला धक्का! अनिल देशमुख प्रकरणी एसआयटी तपासाची मागणी फेटाळली

सद्यस्थितीत धरणामध्ये 47 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी आज अखेर धरणामध्ये 52 टक्के पाणीसाठी शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाच टक्यांनी पाणीसाठा कमी आहे.

एप्रिल महिना सुरू झाला असून शहरामध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून सद्यस्थितीत नागिरकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.

कोल्हापूर : बायकोला अमानुष मारहाण करून भररस्त्यात विवस्त्र करण्याचा प्रयत्न

शहरासाठी पवना धरणातून 480 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधार्‍यातून ते पाणी उचलून शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. असे दररोज 510 एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते.

शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता शहरासाठी आंद्रा व भामा-आसखेड येथून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सद्यस्थितीत मिळणार्‍या 510 एमएलडी पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Back to top button