पुढारी ऑनलाईन डेस्क : उपवासादिनी किंवा एखाद्या धार्मिक सणादिनी साबुदाणा खिचडी हा खाद्यपदार्थ सर्रास खाल्ला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात आदी राज्यांमध्ये साबुदाणा खिचडी खूपच लोकप्रिय आहे. पण, हा खाद्यपदार्थ केवळ तोंडाला पाणी सोडणारा किंवा महिलांच्या आरोग्यासाठी 'सुपरफूड' (Superfood) म्हणून उपयुक्त ठरणारा आहे का?
यासंदर्भात प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋुतुजा दिवेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर साबुदाणा खिचडीचे 'आरोग्य आणि संप्रेरका'संबंधी फायदे उद्धृत केलेली आहेत. साबुदाणा खिचडी (Superfood) हा पदार्थ दुग्ध आणि स्निग्धमुक्त असून त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हा पदार्थ खाल्याने कोणते फायदे होतात, हे आहारतज्ज्ञ ऋुतुजा दिवेकरांनी दिलेल्या माहितीतून जाणून घेऊ…
१) संसर्ग किंवा ताप या आजारातून तुम्ही नुकतेच बाहेर पडला असाल तर, तुमचं शरीर पूर्वपदावर येण्यासाठी एक वाटी साबुदाणा खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो."
२) मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेल तर तो टाळण्यासाठी या पदार्थाचा उपयोग होऊ शकतो. त्याकरिता आठवड्यातून एकदा एक वाटी साबुदाणा खिचडी खावी किंवा जास्त रक्तस्त्राव होत असल्यास मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी साबुदाणा खिचडी खावी.
३) गर्भवती राहण्याचा विचार करत असाल किंवा प्रजनन पातळी सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर साबुदाणा खिचडी उपयुक्त ठरते. गर्भवती राहिल्यानंतर जेव्हा इंजेक्शन सुरू होतात तेव्हा आठवड्यातून दोनवेळा साबुदाणा खिचडी खावी.
४) मासिक पाळीमध्ये तुमचे डोके दुखत असेल किंवा तुमचे डोके जड होत असेल किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर, साबुदाणा खिचडी खाणे उत्तम आहे. खिचडी खाण्याची हीच वेळ योग्य असते.
५) ओव्हुलेशनचे (बीजांड स्त्राव) डाग दिसू लागल्यास साबुदाणा खिचडी खाणे अतिउत्तम आहे. यावेळी एक मोठी वाटी खिचडी खावी.
६) पीएमएस किंवा मासिक पाळी आधीच्या आठवड्यात जास्त भूक लागते. यावेळी दुपारी दह्यासोबत साबुदाणा खिचडी खावी. त्याचे आरोग्यदायी फायदे खूप महत्वाचे ठरतात.
हे वाचलंत का?