सांगली : अवकाळी पावसाने वाळवा तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायकांचे नुकसान | पुढारी

सांगली : अवकाळी पावसाने वाळवा तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायकांचे नुकसान

बोरगाव; पुढारी वृत्तसेवा: वाळवा तालुक्यातील बोरगावसह परिसराला वादळी वारा आणि अवकाळी पावसाने गुरुवारी (दि.२४) रोजी सायंकाळ झोडपून काढले. यामुळे शेतकर्‍यासह पोल्ट्री व्यवसायकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

पोल्ट्रीचे पत्रे उडून पिंजरावर कोसळल्याने पिंजऱ्यातील पक्षी हजारो पक्ष्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्याने पोल्ट्री व्यवसायाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. वारा व विजेच्या कडकडाटासह पावसामुळे अनेक घराची कवले, पत्रे उडून गेली आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने लोखंडी पूल कोसळले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

गहू, हरभरा यासारख्या पिकांच्या क्षेत्रात पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे व्यापारी, व्यवसायिक शेतकरी यांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करून शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी पोल्ट्री व्यवसायकांतून होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button