नाशिक : घंटागाडी कर्मचार्‍यांना पालापाचोळ्यात सापडले बिबट्याचे कातडे | पुढारी

नाशिक : घंटागाडी कर्मचार्‍यांना पालापाचोळ्यात सापडले बिबट्याचे कातडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृतसेवा
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल ज्युपिटरसमोर बिबट्याचे कातडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. कातडे पाहण्यासाठी या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या नागरिकांनी गर्दी केली होती.

पाथर्डी फाटा येथील सर्व्हिसरोड लगत उड्डाणपुलाच्या जागेत बुधवारी (दि. 23) दुपारी दीडच्या सुमारास घंटागाडी कर्मचारी साफसफाई करीत असताना त्यांना पालापाचोळ्यात बिबट्याचे कातडे आढळून आले. भर नागरी वस्तीत बिबट्याचे कातडे सापडल्याने रस्त्याने ये-जा करणार्‍या नागरिकांनी गर्दी केली होती. काहींनी तसेच घंटागाडी कर्मचार्‍यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी कातड्याची पाहणी केली. तर तीन ते चार वर्षांच्या बिबट्याचे हे कातडे असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. याबाबत पुढील तपास वनविभागाचे अधिकारी व इंदिरानगर पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button