शिमला, मनाली या थंड हवेच्या ठिकाणी मोडले तापमानाचे विक्रम | पुढारी

शिमला, मनाली या थंड हवेच्या ठिकाणी मोडले तापमानाचे विक्रम

शिमला वृत्तसंस्था :  हिमाचल प्रदेशमधील थंड हवेची ठिकाणे असलेली प्रमुख पर्यटनस्थळे शिमला, मनाली आणि धर्मशाला येथे मार्च महिन्याच्या मध्यातच तापमानाने मागील 12 ते 18 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.

उन्हाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी सहलीच्या योजना आखत असतील; पण ही बातमी त्यांची निराशा करणारी आहे. विक्रमी बर्फवृष्टीनंतर हिमाचल प्रदेशातील उष्णतेनेही कहर केला आहे. शिमल्यात 17 मार्च रोजी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस होते. यापूर्वी 2010 मध्ये मार्चमध्ये विक्रमी किमान तापमान 16.5 अंश होते. मनालीत तर मार्च महिन्यात कमाल तापमान तब्बल 27.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यापूर्वी 2004 मध्ये या काळातील विक्रमी कमाल तापमान 27 अंश होते. धर्मशाला येथे कमाल तापमान 32.2 अंश नोंदवले गेले, यापूर्वी 2010 मध्ये धर्मशाला येथे 31.6 अंश सेल्सिअस विक्रमी तापमान होते.

Back to top button