नाशिक : बॅण्डवाल्याच्या घरात चौदा लाखांची चोरी | पुढारी

नाशिक : बॅण्डवाल्याच्या घरात चौदा लाखांची चोरी

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा ; ठेंगोडा येथे घरफोडी होऊन तब्बल 13 लाख 79 हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याची खळबळजनक घटना घडली. मंगळवारी दिनेश पगारे (32, रा. अण्णा भाऊ साठे नगर) यांनी फिर्याद दाखल केली.

रविवारी ते सोमवार (दि.21) रात्री साडेदहाच्या दरम्यान अज्ञातांनी त्यांच्या राहत्या घरात घरफोडी केली. पगारे कुटुंबीय पाचोरा येथे गेले होते. सोमवारी रात्री घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. महिला बचत गटाकडून घेतलेले अडीच लाख, तसेच दोघांकडून हातउसनवार घेतलेले चार लाख आणि ब्रास बँडच्या सुपारीचे दीड लाख अशी रोख रक्कम तसेच 5 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 5 तोळे वजनाची सोन्याची गोफ, 2 तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, एक व दोन तोळे वजनाची सोन्याची ठुशीमाळ, तीन तोळे वजनाची मंगलपोत, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ व 7 ग्रॅम वजनाचा नेकलेस असा 13 लाख 79 हजारांचा मुद्देमाल कपाटात ठेवला होता. तो चोरीला गेला.

अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सखोल पाहणी केली. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार हे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button