नाशिक : गरम पाण्यात पडून गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूजा सुनील जाधव (२८, रा. विहीतगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्या चक्कर येऊन गरम पाण्यात पडल्या होत्या. त्यांच्यावर सिन्नर फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. २०) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.