ओबीसी आरक्षणासाठी एकजूट दाखवा : ना. भुजबळ

ओबीसी आरक्षणासाठी एकजूट दाखवा : ना. भुजबळ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला भटक्या जमाती प्रवर्गाचे अर्थात ओबीसी आरक्षण मिळत आहे. धनगर समाजाकडून आदिवासीप्रमाणे सवलती देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आदिवासी प्रवर्गाचे लाभ मिळतील, तेव्हा मिळतील. मात्र, आधी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी या प्रवर्गातील सर्व जातींनी एकजूट दाखवण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शहरातील कालिदास कलामंदिर येथे पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित युगपुरुष मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, जिल्हाध्यक्ष दत्तू बोडके, नगरसेवक किशोर ढेपले, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनंजय तानले उपस्थित होते. ओबीसी समाजाला संविधानिक आरक्षण असून, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्य खंडपीठाने ते मान्य केले. न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण नाकारले नसल्याचे ना. भुजबळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चांदवडच्या रंगमहालाच्या दुरुस्तीसह सुशोभीकरणाच्या कामाला पर्यटनमंत्री असताना 15 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, अद्यापही काम अपूर्ण आहे. लवकरच या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम मार्गी लावले जाईल असे आश्वासन ना. भुजबळ यांनी दिले.

असे आहेत पुरस्कारार्थी…
बाजीराव शिंदे (विभागीय सहनिबंधक, मुंबई), तुकाराम महाराज जेऊरकर, देवीदास चौधरी (साहित्यिक तथा मा. उपजिल्हाधिकारी), रोहन कुंवर (उपजिल्हाधिकारी), महेंद्र दुकळे (सचिव, नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ), पूनम मोगरे (नगरसेविका), दत्तू देवकर (प्रगतशील शेतकरी), बाळासाहेब मुरडनर (उद्योजक), डॉ. विजय थोरात (जनरल सर्जन), धनंजय वानले (पत्रकार), विजय गाढे (आंतरराष्ट्रीय खेळाडू).

एसटी आरक्षण पुढचा भाग : ना. भरणे
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचा भटक्या जमाती प्रवर्गात समावेश झाला आहे. आदिवासींप्रमाणेच आरक्षण मिळावे, हा पुढचा भाग आहे. आगामी काळातही सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल. त्याच धर्तीवर चांदवडच्या रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून देण्याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना ना. दत्तात्रय भरणे यांनी दिली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news