NASA : ‘नासा’ने तयार केले ब्रह्मांडाचे भव्य चित्र | पुढारी

NASA : ‘नासा’ने तयार केले ब्रह्मांडाचे भव्य चित्र

न्यूयॉर्क : खरोखरच ब्रह्मांड किती मोठे आहे, याची कल्पना माणसाला नाही. भविष्यात ती होण्याची शक्यताही कमीच आहे. मात्र, आजपर्यंत माणसाने जितके ब्रह्मांड पाहिले आहे, ते चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खरोखरच हे छायाचित्र अत्यंत आल्हाददायी आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने माणसाला जितके माहीत आहे, तितक्या ब्रह्मांडाचे छायाचित्र तयार केले आहे. यास ‘नासा’ने दिसणारे ब्रह्मांड (Observable Universe) असे नाव दिले आहे. हे चित्र तयार करण्यासाठी ‘नासा’ने जगातील अनेक दुर्बिणी, रेडिओ टेलिस्कोप, रडार आणि स्पेस टेलिस्कोपची मदत घेतली. दिसणार्‍या ब्रह्मांडाचा आकार 28.5 गीगापारसेक्स म्हणजे 99 बिलियन प्रकाशवर्षे इतका मोठा आहे. सर्वसाधारण भाषेत हा आकार 9300 कोटी प्रकाशवर्षे इतका मोठा आहे, असे म्हटले जाऊ शकते. यातील 14.26 गीगापारसेक्स म्हणजे सुमारे 4,650 कोटी प्रकाशवर्षे भाग शास्त्रज्ञांनी पाहिलेला आहे.

ब्रह्मांडाचा नकाशा तयार करण्यासाठी आतापर्यंत सहावेळा मोठ्या प्रमाणात सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेतून असे सिद्ध होते की, ब्रह्मांडात 30 ते 200 मेगापारसेक्स इतक्या लांब आकृत्या आहेत. यामध्ये अवकाशीय भिंती आहेत. आकाशगंगांचे समूह, फिलामेंटस् आणि सुपरक्‍लस्टर्स आहेत. ग्रह, तारे, सुपरनोवा आणि नेब्यूलाही आहे. यास कॉस्मिक वेबही म्हटले जाते.

हेही वाचलत का ?

Back to top button