जितेंद्र आव्हाड यांच्या फार्महाऊसवरील चोरीचा छडा ; चोरट्यांना बेड्या | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांच्या फार्महाऊसवरील चोरीचा छडा ; चोरट्यांना बेड्या

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सिन्नर येथील फार्महाऊसवर एलसीडी चोरणा-या तसेच नाशिकरोड व नाशिक शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या, दुचाकी चोरणा-या तीन संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी होत असल्यामुळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घरफोडी चोरी करणार-या आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आले होते. तसेच सिन्नर तालुक्यात पास्ते या गावात कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या फॉर्म हाउस मध्ये घरफोडी झाल्याने परिसरात बघराट पसरली होती.

या घरफोडी संदर्भात कोणत्याही प्रकारचे सी.सी.टि.व्ही फुटेज नसल्याने आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. त्या अनुषंगाने नाशिकरोड पोलीस ठाणेचे वपोनि अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी सपोनि योगेश पाटील व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या.

त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त माहितीद्वारे सराईत गुन्हेगार अर्जुन गोरख धोत्रे रा. सिन्नर यास ताब्यात घेतले. साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली.  त्याचे साथीदार आदित्य दशरथ शिंदे / माळी रा. डुबेर व करण प्रकाश घुगे रा. सिन्नर या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

नाशिकरोड पोलिसांनी  या तीन आरोपींना अटक करुन 60 ग्रॅ्म सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण एकुण 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन एकुण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या सिन्नर येथील फार्म हाऊसमध्ये झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा देखील पोलिसांनी छडा लावला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button