नाशिक : दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले | पुढारी

नाशिक : दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कंत्राटी कर्मचाऱ्याचे नियुक्ती आदेश व वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. माणिकलाल रोहिदास पाटील (५२) असे लाच स्वीकारणाऱ्या मुख्यध्यापकाचे नाव आहे.

तक्रारदार हे वैतरणानगर (ता. इगतपुरी) येथे असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेवर कामाठी म्हणून दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कामास आहे. १६ नोव्हेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीतील नियुक्ती आदेश आदिवासी विकास विभागातून मिळवून देण्यासाठी व त्या काळातील वेतन मिळावे यासाठी ३४ वर्षीय तक्रारदार यांनी मुख्याध्यापक पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी तक्रारदाराकडे कामाच्या मोबदल्यात दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी (दी.१५) पंचसमक्ष मुख्याध्यापक पाटील यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले.

हेही वाचा :

Back to top button