वीज उपकेंद्र शेतकरी व उद्योजकांना उर्जा प्रदान करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील | पुढारी

वीज उपकेंद्र शेतकरी व उद्योजकांना उर्जा प्रदान करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पुढारी वृत्तसेवा :  चिंचोली येथे वीज उपकेंद्र असावे ही मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. मध्यंतरी कोविडमुळे याला निधी मिळण्यात अडचणी आल्या असल्या तरी कृषी धोरण-२०२० अंतर्गत जिल्ह्यातील पहिले सब-स्टेशन येथे उभारण्यात येणार असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील घरगुती ग्राहकांना तर लाभ होणारच आहे. पण, यासोबत शेतकरी आणि परिसरातील उद्योजकांना हे उपकेंद्र उर्जा प्रदान करणार असून यामुळे परिसरातील प्रगतीला वेग येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते चिंचोली येथील ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपुजनाप्रसंगी बोलत होते.

तालुक्यातील चिंचोली येथे नुकतेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता मो. फारूक शेख, जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरूध्द नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, पंचायत समिती सभापती पती जनाआप्पा पाटील, संजय वराडे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, अनिल भोळे, बाजार समिती सदस्य पंकज पाटील, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, प्रवीण पाटील, योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, धानवडचे सरपंच संभाजी पवार, उमाळ्याचे राजू पाटील, कुसुंबाचे दंगल पाटील, रायपूरचे नितीन सपकाळे, कंडारीचे मनोज धनगर, देवीदास कोळी, जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी, नंदकुमार देशमुख, साईराज बिर्‍हाडे, ब्रिजलाल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक शेख यांनी केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व उर्जामंत्री ना. नितीन राऊन यांच्या सहकार्याने उपकेंद्राच्या कामास प्रारंभ झाला असून नवीन वीज उपकेंद्राचे काम मुदतीत व दर्जेदार होणार असल्याची खात्री त्यांनी दिली. सध्या चिंचोली उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. वाढत्या मागणीमुळे व यंत्रणेवरील भार वाढत असून या भागात कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच चिंचोली गावठाण, चिंचोली शेती यांची लांबी ३८ किलोमीटर होती. यामुळे अडचणी येत होत्या. जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहा नवीन उपकेंद्र उभारणे व ७ उपकेंद्रांची क्षमता वाढ करणे प्रस्तावित केले आहे. यासाठी लवकरचा मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button