जळगाव : सराईत गुन्हेगार ‘चिल्या’ ला ठोकल्या बेड्या | पुढारी

जळगाव : सराईत गुन्हेगार 'चिल्या' ला ठोकल्या बेड्या

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; शहरात मोबाईल व दुचाकी चोरी करणारा सराईत युसूफ शेख उर्फ चील्या याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तो ३ बालकांच्या मदतीने गुन्हे करत होता.

महिन्याभरापासून जळगाव शहरात मोबाईल स्नॅचींग, घरफोडी व मोटार सायकलचोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करुन सपोनि जालींदर पळे, सफौ युनुस शेख, अशोक महाजन, पोह सुनिल दामोदरे, पोह विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, पोना अविनाश देवरे, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, चालक सफौ राजेंद्र पवार यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली होती.

हे पथक शहरात फिरुन गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना पो. नि. किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत युसुफ शेख उर्फ चिल्या ( रा. शिवाजी नगर हुडको ) व त्याचे साथीदार यांनी शहरात मोबाईल स्नॅचींगचे गुन्हे केल्याची बातमी मिळाली ते शिवाजी नगर भागात राहतात. पथकाने शिवाजीनगर भागात फिरून आरोपीची माहिती काढून आरोपी युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख यास ताब्यात घेतले होते. आरोपी युसुफ शेख याने व त्याचे ३ साथीदार अल्पवयीन बालक यांनी मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी युसुफ शेख याच्याकडून  विविध ७ गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जालींदर पळे करीत आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button