नंदुरबार : घरातून दुर्मिळ जातीचे चार कासव जप्त; एकास अटक | पुढारी

नंदुरबार : घरातून दुर्मिळ जातीचे चार कासव जप्त; एकास अटक

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा
दुर्मिळ जातीचे चार कासव नवापूर येथील एका घरातून जप्त करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून ही कारवाई केली असून एकास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक, नवापूरचे वनक्षेत्रपाल यांनी विशाल सुनिल पिसे राहणार जुनी महादेव गल्ली, नवापूर यांच्या घराची झडती घेतली असता पिसे यांच्या घरी काचेच्या फिश टँकमध्ये बंदिस्त ठेवलेले तीन विदेशी प्रजाती व एक भारतीय प्रजातीचे जीवंत कासव आढळून आले. ते जिवंत कासव ताब्यात घेऊन विशाल सूनिल पिसे, राहणार जुनी महादेव गल्ली, नवापूर यास ताब्यात घेवून भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील गुन्ह्याचा तपास वनक्षेत्रपाल नवापूर व वन पाल वडकलंबी करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार स्नेहल अवसरमल, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रा. शिवाजी रत्नपारखे, वनक्षेत्रपाल चिंचपाडा, प्रादेशिक वनक्षेत्रचे कर्मचारी यांनी वनसंरक्षक धुळे दि. वा. पगार, शहादा वनविभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

हेही वाचा :

Back to top button