पुढारी ऑनलाईन डेस्क : अपक्ष आमदार रवी राणा यांनी आज (सोमवार) विधिमंडळाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना फाशी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान, अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधकांनी विधानसभेत आक्रमक होत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर रवी राणा यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, शिवभक्तांनी आयक्तांवर शाईफेक केली, त्यावेळी मी दिल्लीमध्ये बैठकीत होतो. मला फोन करून तुमच्यावर अमरावतीत ३०७ चा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले, असे रवी राणा यांनी सांगितले.
सरकारमधील लोकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यांनी म्हटले आहे. १०० ते १५० पोलिसांनी माझ्या घरी जाऊन तपासणी केली. त्यावेळी वृद्ध आई उपस्थित होती. तसेच यावेळी खासदारांचाही अपमान करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगून मला अटक करायचे आदेश देण्यात आल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर पाच दिवसांनी उड्डाणपुलावरुन पुतळा हटवण्यात आला. छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने हा पुतळा काढून गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला. आमच्या आराध्य दैवताला गोडाऊनमध्ये टाकल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. त्यामुळेच काही शिवभक्तांनी महापालिका आयक्तांवर शाई फेकल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ